मोडीची गोडी


Sunday, May 9, 2010

मोडीची गोडी

आज मोडीतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या लिप्यंतरासाठी मोडीतील जाणकारांची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर पुराभिलेख विभागाने हाती घेतलेला मोडी प्रशिक्षणाचा उपक्रम संबंधितांसाठी दिलासादायक आहे. पुराभिलेख विभागाने तयार केलेला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 12 दिवसांचा आहे. आजपासून हे वर्ग मुंबईत सुरू होत असून त्यांचा शुभारंभ डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते होत आहे. 

मोडीलिपीत दुसरा उकार आणि पहिली वेलांटी नसते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. ' न थांबता न मोडता झरझर लिहिणे ' हा मोडीचा उद्देश असल्यामुळे या उकाराला आणि वेलांटीला फाटा देण्यात आला! मोडी लिहिणारा माणूस आधी एक लांबलचक रेषा मारतो आणि त्यानंतर त्याच्यालपेटदार अक्षरांची सुरू होणारी गाडी थांबते ती पूर्णविरामावरच! या लेखनात दुसरा उकार आणि पहिली वेलांटी असती , तर लेखकाला किंवा लेखनिकाला सारखे मागे यावे लागले असते आणित्यामुळे मोडीचा मूळ उद्देशच संपुष्टात आला असता. 

महाराष्ट्रात मोडी वाचणारी आणि लिहिणारी माणसं आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. या संख्येत वाढ व्हावी यासाठी काही मोडीप्रेमी व्यक्ती आणि संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक काम करीत आहेत. त्यात आता शासकीय प्रयत्नांची भर पडली असून मोडीच्यापुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पुराभिलेख खात्यानेही पुढाकार घेतला आहे. 

मोडीच्या पुनरुज्जीवनाची गरज काय , असा एक प्रश्ान् पडू शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार असणारी मोडी लिपीतील सुमारे सात कोटी कागदपत्रे आज उपलब्ध आहेत.इतिहासाचा अभ्यास करणारे विद्याथीर् आणि संशोधकांना मोडीचे ज्ञान असल्याशिवाय या कागदपत्रांचा अन्वय लावता येणे केवळ अशक्यच! 

' भारतीय ऐतिहासिक आयोग ' ही या क्षेत्रात काम करणारी देशातील सवोर्च्च संस्था केंद शासनात कार्यरत आहे. इतिहासजमा होऊ घातलेल्या सर्वच लिप्यांचे पुनरुज्जीवन करून अभ्यासकांना मदत करावी , असा ठराव या आयोगाने 1979 साली घेतला. या ठरावाच्या आधारेच महाराष्ट्राचापुराभिलेख विभाग या कामासाठी पुढे सरसावला असून या अनुषंगाने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ' मोडी प्रशिक्षण वर्ग ' हा त्यातील सर्वाधिक लोकप्रिय उपक्रम. 

मोडीचा उगम हा 12 व्या शतकातील असून यादव काळातील एक विद्वान दिवाण हेमादी पंत यांनी ती ' न मोडता न थांबता झरझर लिहिण्यासाठी ' सुरू केली. तत्कालिन राजे-महाराजे ,प्रधान आपला पत्रव्यवहार आपल्या लेखनिकाला ' डिक्टेट ' करीत असत. या लेखनिकांना झपाझप लिहून घेणे सोपे व्हावे यासाठी अशी लिपी असणे गरजेचेच होते. 

प्रामुख्याने शासकीय कामकाज जरी मोडीलिपीतून होत असले तरी बऱ्याचशा बखरी , ऐतिहासिक बाडे आणि तत्सम अन्य साहित्यही मोडीमध्ये उपलब्ध आहे. 1835 सालची प्रतापसिंहमहाराजांची दैनंदिनी मोडीत असून ' भवानी तलवार शिवाजी महाराजांनी गोवेलकर सावंतांकडून300 होनास विकत घेतली ' असा उल्लेख त्यात असल्याची माहिती पुराभिलेख विभागाचेसंचालक भास्कर धाटावकर यांनी दिली. 

आज मोडीतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या लिप्यंतरासाठी मोडीतीलजाणकारांची मोठी गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुराभिलेख विभागाने हाती घेतलेला मोडी प्रशिक्षणाचा उपक्रम संबंधितांसाठी फारच दिलासादायक आहे. पुराभिलेख विभागाने तयार केलेला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केवळ 12 दिवसांचा असून त्यात रोज दोन तास शिकविले जाते. एका वेळी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचे शुल्क दोनशे रुपये आहे. 100 मार्कांची परीक्षा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. 

आजवर कोल्हापूर , औरंगाबाद , अलिबाग , पुणे अशा ठिकाणी हे प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले असून आजपासून हे वर्ग मुंबईत सुरू होत असून त्याचा शुभारंभ डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते होत आहे. 

महसूल खात्यातील सर्वच अधिकाऱ्यांना हे प्रमाणपत्र अनिवार्य केल्यास त्याचे महत्त्व तर वाढेलच; पण मोडीची गोडीही त्यांच्या मनात निर्माण होईल. इतिहासाचे विद्याथीर् , संशोधक , अभ्यासू पत्रकार आणि अन्य माध्यम प्रतिनिधींही मोडी समजून घेण्यासाठी पुढे आले पाहिजेत. जर आपण फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्याच्या गप्पा करतो तर आपली स्वत:ची मोडी लिपी आपल्याला कामाहीत नको 


Comments

Popular posts from this blog

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना

Learn MoDi script online

ब्रेल लिपि