मोडी लिपी उगम , विकास , इतिहास
- Get link
- X
- Other Apps
मोडी लिपी , MODI LIPI,MODI SCRIPT, मोडी स्वर आणि व्यंजन, मराठी ची धावती लिपी, ऐतिहासिक लिपी,पिशाच्च लिपी, मोडी मूळाक्षर, Modi ALphabets, मोडी लिपी विषयी अधिक माहिती, जलद लिपी, लपेटीतील अक्षरे, मौर्यांची लिपी,modi lipi documents,marathi to modi lipi,modi lipi,modi lipi classes,Devanagari,modi lipi ka prayog,balbodh script,marathi script writing,peshwa daftar
▼
Monday, January 21, 2019
मोडी लिपी उगम , विकास , इतिहास
मोडी लिपी उगम , विकास , इतिहास
मोडी लिपी ही स्वतंत्र लिपी नसून देवनागरीची व "कुटिल लिपी"ची एक उपलिपी आहे , असे काहींचे म्हणणे आहे . कुटिल लिपीची निर्मिती ही "ब्राह्मी लिपी" पासून झाली . ब्राह्मी लिपी पासून "गुप्त लिपी" बनली गेली . गुप्त राजाच्या कारकीर्दीत उत्तर हिंदुस्थानातील बहूतेक भागांत प्रचलित होती. कुटिल लिपीच्या नावावरूनच या लिपीच्या निर्मितीची गरज अथवा तिचे वैशिष्ट्य काय असेल याचा बोध होतो . ब्राह्मी लिपीतील स्वर , व्यंजन , मात्रांना लिहिण्यासाठी सोपी पडावी म्हणून त्यांच्या वळणात योग्य तो बदल करून बनवली गेली . हा बदल करताना त्यांच्या मुळाक्षरांच्या वळणात वाकडेपणा , वक्रता दिसून येतो . म्हणून या लिपीला "कुटिल लिपी "किंवा मुरडलेली लिपी अर्थात "मोडी लिपी" असे म्हणतात . इ . स . ६ व्या शतकात ही लिपी प्रचारात होती . (राष्ट्रकूट वंशीय दंतीदुर्ग राजाच्या वेळचा इ .स ७५४ मधील शिलालेख या लिपीतून कोरलेला उपलब्ध आहे .) कुटिल लिपी ला "कायस्थ" तसेच "कैथी " लिपी असेही म्हणतात . कुटिल लिपी पासूनच मोडी लिपी बनली असावी असे काही विद्वानांचे मत आहे . कुटिल हा संस्कृत शब्द आहे व मोडी हा मराठी शब्द आहे. मात्र या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. ज्या अक्षरांच्या मुळ वळणात मोड पाडली गेली अथवा ते मुरडले गेले . अशा अक्षरांच्या वर्ण मालेला मोडी अथवा कुट लिपी असे म्हणतात .यावरून मोडी लिपी ही स्वतंत्र लिपी नसून "देवनागरी" अथवा "कुटिल लिपी"ची च एक उपलिपी आहे असे मानले जाऊ लागले .
इतिहास
मोडी लिपी ही नेमकी केव्हापासून सुरू झाली या बद्दल इतिहासात एकमत नाही . काही विद्वानांच्या मते या लिपी चा उगम सुमारे २ हजार वर्षे इतका असावा . भारतात मगध साम्राज्यात मौर्य वंशाचे महापराक्रमी राजे चंद्रगुप्त मौर्य , सम्राट अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात आली असे मानले जाते .
१ मौर्यांची लिपी म्हणून तिला "मोडी " म्हटले जाऊ लागले .
२ मोडी लिपीत अपूर्ण वर्ण काढायची सोय नाही . त्यामूळे संयुक्त वर्ण बालबोध प्रमाणे मोडी लिपीत बिनचूक लिहिता येत नाहीत .
उदाहरणार्थ 'व्य' चे लेखन 'वय' असे केलेले आढळते.
३ त्या काळात अशोक लिपी होती . त्यातही र्हस्व , दीर्घ व्यवस्था नसल्यामुळे अशोक लिपीची सुधारित आवृत्ती म्हणजे मोडी लिपी असे मानले गेले .
दुसरे मत असे की सुमारे सातशे वर्षापूर्वी दक्षिण हिंदुस्थानात यादवांचे साम्राज्य होते. महादेव राव यादवांचे कारकीर्दीत हेमाडपंत किंवा हेमाद्रिपंत नामक प्रख्यात महामंत्री होऊन गेले. ( इ .१२६० श ११८२ ) हेमाड पंतांचे मराठी भाषेवर अलोट प्रेम होते.त्यांनी मराठीत अनेक ग्रंथ लिहिले असावेत . खाजगी व राजकीय व्यवहारात लिहावायच्या पत्रांचे मायने कसे असावेत , याबद्दल त्यांनी काही मेस्तके (नियम) तयार केले होते . यादव राजा सिंघण यांच्या वेळेपासून दरबारचे काम संस्कृत भाषेत चालत होते . परंतू हेमाद्रीपंतांनी ही प्राचीन वहिवाट बदलून राजकीय कागदपत्र , सनदा, दानपत्रे, फर्मान, हुकूमनामे, निवाडपत्रे,इनामपत्रे वैगरे मराठीत लिहिण्याचा नवीन उपक्रम सुरू केला. अर्थात देवनागरी हीच दरबारची लिपी होती . परंतु त्या लिपीत सुबोध व सुवाच्य रितीने लिहावयाचे म्हटल्यास वेळेचा अपव्यय होतो . हे टाळण्यासाठी व अल्प वेळांत बराच मजकूर लिहिता यावा म्हणून हेमाद्रीपंतांनी "लघुलेघन पद्धती " तयार केली . तिलाच "मोडी लिपी" असे म्हटले जाते. तिचे जनकत्व हेमाद्रीपंतांकडेच जाते
असे म्हटले जाते की हेमाडपंताना बाजरीचे बी व मोडी लिपी आणण्यासाठी लंकेला जावे लागले . हेमाडपंतांनी अनेक सुधारणा राज्यात घडवून आणल्या. दूरवर पसरलेल्या साम्राज्यातील पत्रव्यवहार झपाट्याने व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करुन त्यांनी मोडी लिपी तयार केली असावी .
परंतु प्रसिद्ध मोडी लिपी तज्ञ श्री. ल.श्री.वाकणकर यांना हे मान्य नाही की हेमाडपंत बाजारीच बी व मोडी लिपी आणण्यास तिथे गेले असतील , कारण देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य कन्याकुमारीपर्यंत पसरलेले होते . व लंका हा जवळचा प्रदेश म्हणून ते लंकेत (इ.१९८० श १९०२ ) गेले होते . दक्षिणेकडील प्रांतात जाऊन साम्राज्यातील दप्तरे तपासण्यास ते गेले होते . व कदाचित लंकेची यात्रा करुन आल्यावर सर्व दप्तरे मोडीत लिहिण्याचे वटहुकूम काढण्यास एकच गाठ पडल्यामुळे लंकेचा व मोडी लिहिण्याचा संबंध जोडला गेला असावा . ते लंकेत (इ.१९८० श १९०२ ) गेले होते त्यावेळी त्यांनी कोलंबोच्या सरकारी छापखान्यात " सिंहली " अक्षरांना गणकयंत्रात बसवण्याच्या दृष्टीने अभ्यास केला पण तेव्हा त्यांना "सिंहली " व मोडी लिपीत काहिही साम्य दिसून आले नाही . तसेच मौर्य या शब्दाचा मोडी हा अपभ्रंश देखील ते अमान्य करतात . कारण मौर्य राज्य काळी मोडी च्या जन्माची ही शक्यता नव्हती . देवनागरीत जो काना वरुन खाली काढतात तो शेवटी लेखनाचा वेग वाढवण्यासाठी खालून वर नेण्याच्या प्रयत्नाने मोडी वळण निर्माण झाले . व ही घटना हेमाडपंतांच्या कारकीर्दीत घडणे शक्य आहे .
तिसरे मत असे की शिवाजी महाराजांचे विद्वान चिटणीस बाळाजी आवजी यांचेही ही नाव या संदर्भात घेतले जाते तथापि बाळाजी आवजी च्या पूर्वीचे हजारो मोडी कागद उपलब्ध असल्याने त्यात तथ्य नाही.कदाचित बाळाजी आवजीने मोदी लिपीत काही बदल करून तिला अधिक वळणदार स्वरूप करून देण्याचा प्रयत्न केला असणे शक्य आहे.
मोडी लिपीतील सर्वात जुना उपलब्ध असलेला कागद इ १३८९ (श १३११) मधील असून तो " भारत इतिहास संशोधक मंडळाच्या " संग्रहालयात उपलब्ध आहे .
देवनागरी व मोडी लिपि यांचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर मोडी लिपि तज्ञ श्री. ल. श्री. वाकणकर यांचे आज असे स्पष्ट मत झालेले आहे की मोडी लिपी चा उगम इतर कुठल्याही लिपीतून झालेला नसून देवनागरी लिपीतूनच झालेला आहे. मोडी लिपी ही देवनागरी लिपीचीच जलद लिपी मानली गेली पाहिजे
देवनागरी बालबोध अक्षरे सूटी सुटी लिहावी लागतात. एकच अक्षर लिहिताना लेखणी सारखी सारखी उचलावी लागते . त्यामुळे लिखाणाचा वेग मंदावतो. तसेच अक्षरांवर दिली जाणारी रेघ, काना,मात्रा, वेलांटी, विरामचिन्हे ही सुद्धा द्यावी लागतात , त्यामुळे जलद लिखाणासाठी म्हणून मोडी चा वापर सुरू झाला असेच मानले पाहिजे .
वरील सर्व गोष्टींचा विचार करून सुमारे सातशे वर्षा पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश या विस्तृत भूभागावर यादवांचे साम्राज्य होते त्यांतील महादेवराव यादवांचे कारकिर्दीत हेमाडपंत नामक प्रख्यात महामंत्री (करणाधीप) होऊन गेले (इ १२६० श ११८२) या हेमाडपंतांनि राज्यांचे कारभार , दप्तरांतील कामे, हिशेब , पत्रव्यवहारादी कामे जलद गतीने होण्यासाठी म्हणून मोडी लिपीचा वापर करण्यास सुरुवात केली . यादवकालात सरकार दरबारी मोडी लिपीला स्थान मिळाल्यामुळे साहजिकच तिचा प्रसार राज्याच्या कानाकोपर्यात झपाट्याने होऊ शकला व मोडी लिपी व्यवहारात आली .
मोडी लिपी ईतिहास आणखी सविस्तर माहिती खालिल लिंक वर क्लिक करून वाचा :-
https://modeelipi.blogspot.com/2019/02/modi-lipi-itihas-history.html
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment