मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ५
- Get link
- X
- Other Apps
मोडी लिपी , MODI LIPI,MODI SCRIPT, मोडी स्वर आणि व्यंजन, मराठी ची धावती लिपी, ऐतिहासिक लिपी,पिशाच्च लिपी, मोडी मूळाक्षर, Modi ALphabets, मोडी लिपी विषयी अधिक माहिती, जलद लिपी, लपेटीतील अक्षरे, मौर्यांची लिपी,modi lipi documents,marathi to modi lipi,modi lipi,modi lipi classes,Devanagari,modi lipi ka prayog,balbodh script,marathi script writing,peshwa daftar
▼
Monday, June 10, 2019
मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ५
मोडी लिपी प्राथमिक अभ्यास पाठ ५
आता पर्यन्त आपण ३५ अक्षरे शिकलो त्यांत काही स्वर व व्यंजने देखील शिकलो .
आजच्या पाठात आपण " उ " शिकणार आहोत आणि " अ " या स्वरापासून लिहिली जाणारी अक्षर शिकणार आहोत.
"अ" आणि "आ" ही देवनागरीत सारखी दिसणारी अक्षरे मोडी लिपी मध्ये मात्र पुर्णपणे स्वतंत्र पद्धतीने, वळणांनी लिहिलेली सापडतात.
"आ " हे अक्षर मोडी लिपीतील व या व्यंजनाचा वापर करून लिहायचा कसा हे आपण शिकलो .
" अ " हे अक्षर मोडी लिपीत लिहिताना देवनागरी मध्ये जसा अ लिहितात तसाच अर्धा अ लिहून , हात न उचलता शिरोरेघेवरून लिहायला सुरुवात करून , खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे लिहून.
मोडी लिपी मुळाक्षर |
मोडी लिपी मुळाक्षर |
पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे मोडी अ हे स्वराक्षर तयार होते .
एकार
याच मोडी लिपीतील अ या अक्षरावर एक मात्रा दिल्यास , देवनागरीतले " ए " हे स्वराक्षर तयार होते.पुढील चित्रात दाखवल्याप्रमाणे
ऐकार
खालील चित्रात दाखवले आहे त्याप्रमाणे
ए आणि ऐ ही देवनागरी मध्ये लिहिली जाणारी अक्षरे मोडी लिपी मध्ये नाहीत . अ याच स्वरा वर एक व दोन मात्रा देऊन लिहिली जातात.
अ या मोडी लिपी अक्षरावर अनुस्वार दिल्यावर अं हे अक्षर तयार होते .
आणि याच मोडी अ या अक्षरापुढे २ टिंब दिल्यास , विसर्ग लावल्यास अः हे अक्षर तयार होते
मोडी लिपीत अ हे अक्षर खालील प्रकारे लिहिलेले देखील सापडतात.
"उ" हे स्वराक्षर अतिशय सोपे आहे . त्याच्या वळणाचे नीट निरीक्षण करा व पुन्हा पुन्हा लिहायचा सराव करा. उ हे स्वराक्षर संस्कार भारती रांगोळीतील एका चिन्हा प्रमाणेच लिहिले जाते.
गृहपाठ
आज शिकलेल्या अक्षरांचा पुन्हा पुन्हा लिहिण्याचा सराव करा . मोडी लिपीत अ चे दोन वेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत त्या दोघांचा वारंवार लिहिण्याचा सराव करा .- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment