अशाने मराठी इतिहास कायमचा नष्ट होईल


Thursday, August 26, 2010

अशाने मराठी इतिहास कायमचा नष्ट होईल


वर्तमान समाजाची आणिदैनंदिन घडामोडींची  नाळ ही त्या प्रदेशाच्या इतिहासाशी जुळलेली असतेभूतकाळ नसलेल्यासमाजाला आपल्या वर्तमानावर कधीच विधायकसंस्कार  करता येत नाहीतमहाराष्ट्राचा ज्वलनतेजसआणि गौरवशाली इतिहास हा आता पर्यंत आपल्यालाजेमतेम १०% कळला आहे आणि  समजलाआहेही अनभिज्ञतेची ९०कळी विकृत लेखनालापोषक आसते आणि याची प्रचिती आपल्यालासंभाजी ब्रिगेड सारख्या टोळयांमधून दिसून येते.महाराष्ट्राचा तो ९०% अनभिज्ञ आणि अप्रकाशीतइतिहास  अजनूही मोडी कागदपत्रांत दडला आहेहेभारतात वेगवेगळया ठिकाणी आहेतकोटयांमध्येत्यांची संख्या आहेवाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षालाहजारोनी पत्र जाळून टाकली जातातम्हणजे हीआपली ऐतिहासीक अमुल्यावान संपत्ती आणिअप्रकाशित इतिहास कायमचाच नष्ट होत आहे की जोवर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही.रामदेवराव यादव-शहाजी-शिवाजी-शंभुजी-पेशवे हेसर्व केवळ छोटया लेख स्वरुपात शालेयपाठयपुस्तकात राहतीलअसे होऊ नये म्हणुन ज्यांनामहाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि महाराष्ट्रीयअसल्याचा स्वाभिमान आहे अशा लोकांनी मोडीलिपी शिकून या इतिहास संशोधनेच्या यज्ञेत स्वत:हीकाही योगदान दिले पाहिजेइ.स.१९५६ दरम्यानस्व.यशवंतराव चव्हाण यांनी हे ऐतिहासीक दस्तावेजमोडी लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतरकरण्यासाठी मोडी जाणकारांना खुले निमंत्रण दिले.ज्या प्रकारचा उत्स्फुर्त प्रतिसाद आला तो पाहूनयशवंतराव चव्हाण थक्कंच राहिलेमहाराष्ट्रातूनमोडीवाचक पुढे आले नाही याचा त्यांना धक्का बसलानाहीतर त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्याइतिहास विभागाकडून पत्र आले की ‘तुमच्याकडेमोडी लिपी वाचक नसतील तर आमच्याकडीलकुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवूशकतो’. त्यावेळी महाराष्ट्रइंदुरबेळगावतंजावरच्यामराठी जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहलवाटले पण स्वत:ची लाज वातली नाहीआणि आजही ती तशीच कायम आहे. या पृथ्वीवर स्वत:चीसंस्कृतीभाषासाहित्यपरंपरास्थापत्यकलायांच्या जपणुकी बाबत सर्वात उदासीन वृत्ती कोणाचीआहे तर ती महाराष्ट्र शासनाचीमग प्रशासकीयसरकार कोणाचेही असोपुणेच्या भारत इतिहाससंशोधक मंडळात १२ लाखांहून अधीक मोडीकागदपत्र अद्यापही रुमालात बांधलेले आहेततेवाचणारे आणि अचूक लिप्यांतर करणारे जेमतेम १०मोडी लिपी पटाईत असतीलएक पत्र एका दिवसातलिप्यांतरीत होऊ शकतं किंवा १० दिवस सुद्धा लागूशकतातसर्वांना वाटतं मोडी वाचक अधीक पुढे आलेपाहिजेतसरकारलाही वाटतं मोडी वाचकांनी पुढेआले पाहिजे. “आम्हाला असं वाटतं........”एवडयावरंच सगळे थांबतातऐतिहासीक मोडीदस्तावेजांचे लिप्यांतर आणि लेखनाचे कार्य हा फूल-टाईम-जॉब आहेत्यामुळे लोकांनी आणि शासनानेमोडी तज्ञांनी हे कार्य विनामूल्य करावे अशी अपेक्षाबाळगणे ही सर्वथा स्वार्थी आणि कृतघ्नतेची आहेयामोडी लिपी प्रशिक्षणाची केंद्रे आणि मोडी दस्तावेजांचेवाचन  लिप्यांतरण केंद्रे ही महाराष्ट्रातल्या सर्वचजिल्ह्यांच्या प्रमुख शहरांमध्ये तातडीने उघडण्यातयावीतसेच इंदुरबेळगाव  तंजावर सारख्या मराठी मराठी इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या शहरांतसुद्धा अशी केंद्रे उघडावीत. महाराष्ट्रातल्या सर्वचविश्वविद्यालयांच्या एम्.ए.(मराठीआणि एम्.ए.(हिस्ट्रीया विषयांमध्ये याचा समावेश व्हावयास हवा.महाराष्ट्र सरकारच्या धनपूंजीत कसलीही  कमी नाही.पण आपल्याच संस्कृतीभाषा इतिहास  परंपराजपण्याची आणि जगास  दाखवण्याची प्रबळ इच्छेचेदारिद्रय आणि कमतरता मात्र नक्कीच आहेआंदोलनआणि  तोडफोड झाल्या शिवाय ‘आम्हाला याची माहिती नाही’ या वृत्ती आणि तत्त्वाने  चालणार्‍याशासनाने थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल्यासयाबाबत कार्यरत व्हावेएवढया थोर कार्यासाठी भलीमोठी निधी उपलब्ध करून द्यावीकधीही निधी थकवणार्‍या आणि नोकरीची शाश्वती असलेले केंद्रउभारले जावेतमोडी शिक्षक  तज्ञांना पगार वेळचेवेळी मिळावेत  या इतर शासनप्रणीत संस्थांचा दर्जाया केंद्रांना मिळावाअसे जर केले नाही तरमहाराष्ट्राचा इतिहास कायमचा नष्ट होईल ! असेझाल्यास याहून मोठे कृतघ्न आणि सांस्कृतीक नैतिक दरिद्र दुसरे कोण ?

                                                                                                                                                 ...... इति वृता

9 comments:

  1. tumhi je kahi lihiley te satya ahe.
    me modi shiknyacha prayatna karen

    manoj_om@rediffmail.com

    Reply
  2. mala modi shikaychi ahe kuthe shiku shkel te sanga. mi nashik la asto....

    Reply
  3. धनंजय - दुर्भाग्याने नाशिकवासीयांनी मोडी लिपी प्रति फार अनास्था दाखवली. एक ऐंशी वर्षीय गृहस्थ नाशिक मध्ये पाच वर्षांपूर्वी शिकवत होते. 2008 मध्ये एक मुलगा दर रविवारी ठाण्याला येत असे मोडी लिपी शिकायला. तो शिकला सुद्धा. पण त्यानंतर त्याचा आमच्याशी काहीच संपर्क राहिला नाही. त्याचे नाव मला आता आठवत नाही आणि पत्ताही नाही. जर त्याच्या सारखे करू शकलात तर फार सुत्य होईल. पुण्याला जाण्यापेक्षा मुंबईला जाणे हे नाशीककरांना केंव्हाही सोपे.

    मुंबईत दादर ला आणि ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीला सध्या वर्ग सुरु आहेत. दादरला शनिवार संध्याकाळी आणि डोंबिवली रविवारी संध्याकाळी. मी ही विक्रोळीत सुरु करणार आहे. पण शिक्षकांचा शोध सुरु आहे कारण मला दर रविवारी वेळ देता येईलंच असे नाही. 

    मुंबईत 12 वर्गांचा प्राथमीक अभ्यासक्रम असतो आणि 12 वर्गांचा प्रगत अभ्यासक्रम असतो. प्रत्येक वर्ग हा 2 तासांचा असतो. 

    facebook वर मोडी लिपी बाबत - 
    http://www.facebook.com/group.php?gid=123786634305930

    Orkut वर मोडी लिपी बाबत - 
    http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=20726090

    Reply
  4. Dhananjay,
    ऑर्कुट वर मी आताच एक नाशिकचा प्रोफाईल पाहिला - Sarang Patel. हे गृहस्थ मोडी लिपी जाणकार असून त्यांचा नित्याचा सराव असतो.

    Reply
  5. श्री मोडीवैभव चा अंक निर्माण व उपलब्ध करण्याबद्दल धन्यवाद. तो PDF स्वरूपात उतरवून घेण्यासाठी अधिक सोयीचा होईल असे वाटते.
    मी स्वत: ७-८ वर्षांपूर्वी मनोहर जागुष्टे गुरुजींच्या वर्गात मोडी शिकलो होतो, परीक्षाही दिली होती, पण त्यानंतर अनभ्यासामुळे संपर्क तुटला.
    आपल्या कार्याचे कौतुक वाटते.
    मला जमेल तसा पुन्हा अभ्यास करायचा प्रयत्न करीन म्हणतो आहे.

    - दिगम्भा

    Reply
  6. आपल्या आतल्या मोडी लिपीचे पुनर्रुज्जीवन करण्यासाठी तुम्ही जिथे शिकलात त्या मोडी लिपी वर्गाला सदिच्छा भेट द्या. कोणा दोघांना धरून मोडी लिपी पोस्टकार्ड लिहायला सुरु करा. मी अनेकांची मोडीची गोडी अशी पुन्हा सुरु करून दिली आहे. फेसबूकवर श्रीमोडीवैभव हे मासीक चित्र स्वरुपात आहे. तुमचा ईमेल पत्ता द्या. मी तुम्हाला pdf file पाठविन.

    http://www.facebook.com/album.php?id=1065674525&aid=2103644

    Reply
  7. namaste ,me gelya varshee nagapur yethe manuscriptology and palaeographycha course kela tyat modi shikale .8-10 mulana shikavali .pan durdaivane sarva court prakaranech pudhe yetat .itihasache kam apekshit ahe .modi lihita yete ,shikavata yete pan sarav nasalyane ani vel nasalyane vachane neet jamat nahi .lahan mule patkan shikatat ,tyamule jasteet jast lahan mulanpryant pochanyacha manas ahe .....

    Reply
  8. Samitaji - facebook var Modi Script group che sabhasad vha.

    Reply
  9. सर्वात मोठी खंत महणजे आपण आपला ईतिहास जाणुन घेणे साठी उत्सुक नाहीत छत्रपती शिवाजी महाराजां शी खरी आपली आपुलकी व खरा ईतिहास समजायचा आसेल तर मोडी लिपीत विशारद होणे व जने करुन आपण सर्व महाराष्ट्रीयन महाराजांना मानाचा मुजरा तेवहा देउ जर खरा ईतिहास लोकान परयंत येईल शासन किवा सरकार आजिबात उदासीन नाही महाराजांचया नावावर महाराजांचे पुतले उभारुन तयांना मानवंदना देणया ऐवजी मोडी दपतर चा जतन व भाषांतर करणे फार महतवाची बाब पण फार मोठी खंत महणजे आपला ईतिहास समजणे साठी जापान उत्सुक आहे आणि आपण मात्र शुन्य ही खंत जनक बाब नाही तर काय महाराजांचा ईतिहास आपलयाला समजला पाहीजे तेवहा आपण सर्व महाराष्ट्रीयन खरा गौरव करु

    Reply

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना

Learn MoDi script online

ब्रेल लिपि