लिपी म्हणजे काय ?
- Get link
- X
- Other Apps
मोडी लिपी , MODI LIPI,MODI SCRIPT, मोडी स्वर आणि व्यंजन, मराठी ची धावती लिपी, ऐतिहासिक लिपी,पिशाच्च लिपी, मोडी मूळाक्षर, Modi ALphabets, मोडी लिपी विषयी अधिक माहिती, जलद लिपी, लपेटीतील अक्षरे, मौर्यांची लिपी,modi lipi documents,marathi to modi lipi,modi lipi,modi lipi classes,Devanagari,modi lipi ka prayog,balbodh script,marathi script writing,peshwa daftar
▼
Thursday, January 17, 2019
लिपी म्हणजे काय ?
लिपी म्हणजे काय ?
मोडी लिपी म्हणजे जलद लिहिण्यासाठी वर्ण मोडून लिहिण्याची प्रचारात आलेली पद्धत . मोडी लिपीला मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली मानली जाते , मोडी लिपी ही देवनागरी लिपीची एक सुबक लपेटीतील शीघ्र लिपी आहे. भाषेला लिखित स्वरूप देणारी लिपी एखाद्या भाषेची स्वतःपूर्ती असते . अनेक भाषा एकच लिपी वापरतात तसेच एकाच भाषेतले लिखाण अनेक लिप्यांतही सापडते. काळाच्या ओघात अनेक भाषा विरून गेल्या , तश्या अनेक लिप्याही.
लिपी या शब्दाचा उगम हा मूळ "लिप्" यापासून झाला आहे . "लिप्" म्हणजे लिंपणे , माखणे , सारवणे .आपण कागदावर शाईने अक्षर , शब्द , चित्र , चिन्ह इत्यादी "लिंपतो" म्हणून त्याला लिपी असे म्हणतात .
लिप्यांचे दोन ठळक प्रकार सांगता येतात -
१ मुळाक्षरांना एक ठराविक अक्षर ठरवून त्याला योग्य ते वळण ठरवून लिहिली जाते .
२ तर दुसरा प्रकार चित्रलिपी .
तसेच काही लिप्या ह्या चिन्हांचा वापर करून सुद्धा लिहिल्याला सापडतात . चीन ,जपान या प्रदेशांत चित्रलिपि प्रचलीत , तर रोमन , देवनागरी या मूळाक्षर चा वापर करून लिहिलेल्या लिप्या आहेत .
पूर्वी दगड, लाकूड , चामडे , गुहा , ताम्रपट लिहिलेले सुद्धा सापडतात . पण अशा वस्तु अथवा वास्तू वर लिहिलेला मजकूर हा शाईने लिहिलेला नसतो . तो एखाद्या टोकदार हत्यार वापरुन कोरून लिहिलेला असतो . याला कोरणे म्हणतात . उदाहरणार्थ - "शिलालेख". "लीख"म्हणजे कोरणे. शिलालेख याचाच अर्थ शिळेवर , दगडावर कोरलेला लेख व त्यावरूनच "लेखन " हा शब्द तयार झाला .
अशा एकेकाळी वापरात असलेल्या पण आता ज्ञात नसलेल्या लिप्यांची संख्या किती असेल कोणास ठाऊक . कुतूहल हा माणसाचा एक मुळ्धर्म असल्याने अलिकडच्या शतकात अशा लुप्त झालेल्या काही लिप्या पुन्हा उजेडात आल्या .
मुळाक्षरांवर आधारीत असो वा चित्रांवर वा चिन्हांवर लिपीतल्या प्रत्येक प्रतीकांचा एक उच्चार असतो . प्रत्येक भाषा हि प्रथम बोलली जाते . लिहिणे फार नंतरचे. त्या त्या भाषेची एक उच्चार पद्धत त्यामुळे तयार होते. त्यामुळे कुठलीही लिपी उलगडताना मूळ वापर कुठल्या भाषेचा आहे , हे महत्वाचे ठरते . मात्र तेवढ्याच ज्ञानावर लिपी उलगडता येत नाही हे हि खरे .
राजनैतिक , सैनिकी , नागरी क्षेत्रांमधे सांकेतिक भाषेचा वापर फार प्राचीन काळापासून सुरू आहे . हि सांकेतिक भाषा मुद्दाम बनवलेली असते . आपले निरोप , संदेश , आज्ञा , माहिती हे विरुद्ध पक्षाला , त्रयस्ताना कळू नयेत यासाठी निर्माण केलेली असते . विरोधी बाजूची अशी सांकेतिक भाषा उलगडण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो . सांकेतिक भाषा घडवणारे विरुद्ध ती उलगडण्याचा प्रयत्न करणारे ,ही लढाई प्राचीन काळापासून सुरूच आहे .
अशा भाषा उलगडण्यांच्या प्रयत्नांतून ज्या गणिती रिती ज्या युक्त्या माहित झाल्या त्यांचाही एक लांब रुंद इतिहास आहे . इथेही भाषा कुठली याला महत्व आहे . मुख्य म्हणजे अशा रिती युक्त्या याची फार मोठी मदत लिप्या उलगडण्यासाठी होते .
अशीच आपली ही देवनागरी ची जलद लिपी म्हणजेच "मोडी लिपी " जिला " पिशाच्च लिपी " असे देखील संबोधले जाते . ही मोडी लिपी म्हणजेच इतिहासात डोकावण्याचा राजमार्गच आहे .
सध्या आपला अभ्यास हा मोडी लिपी लेखन व वाचन यावर आहे . तरी लिपी विषयक अधिक माहिती मोडी प्राथमिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लिहेन .
- Get link
- X
- Other Apps