मोडी लिपी सामान्य माहिती


Wednesday, January 16, 2019

मोडी लिपी सामान्य माहिती

मोडी लिपी सामान्य माहिती

जगभरातून एकूण दहा हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. तर भारतात १६५२ भाषा
वापरात आहेत . पैकी २२ भाषा मान्यताप्राप्त आहेत .

कालौघात प्राचीन गोष्टी हळू हळू लोप पावत जाणे हे नैसर्गिक असले तरी, एखादी भाषा लोप पावणे म्हणजे त्या भाषेशी निगडीत सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक दस्तऐवज कायमचे काळाच्या पडद्याआड जाणे होय आणि  जिथे भाषाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तिथे लिप्यांचे काय ?

अशीच एक लिपी  म्हणजे  मोडी लिपी. आपल्या मराठी भाषेची , देवनागरीची शीघ्रलिपी  इसवी सन १२५० ते १९५० अशी सातशे वर्षे मोडी वापरली जात होती मराठी साम्राज्याची सारी गाथा याच लिपी ने शब्दबद्ध करून काळाच्या प्रवासाला पाठवली ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांचे साम्राज्य पसरले त्या त्या ठिकाणीं मोडी लिपी चे प्रस्थ होते . मध्ययुगातील बरीचशी कागदपत्रे याच लिपीतून लिहिली गेली .  त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांना, संशोधकांना , आजही या लिपिचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे . तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकालाच  मोडी लिपीचेथोडी तरी माहिती असणे आवश्यक आहे .


मोडी लिपी ही महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची  मौल्यवान  खासियत आहे .  मोडी लिपी महाराष्ट्राच खास वैशिष्ट्य आहे . हिंदवी स्वराज्याचा सारा लेखन संसार  मोडी लिपीतच चालत होता . मोडी सोपी आहे आणि तेवढीच  सुंदरही आहे . मोडीचे जलद व लपेटीदार लेखन हेच तिचे वैशिष्ट्य आहे कागदावर डावीकडून उजवीकडे सरळ ओळ आखून त्यावर हात वर न उचलता धावत्या  अक्षरात लिहीत जायचे कुठेही शब्द तोडायचे नाहीत किंवा कुठेही ह्र्स्व दीर्घ लिहिण्याचा नियम नाही .
इंग्रजीत जसे शॉर्टहँड असते तसेच मोडी हे मराठी चे प्राचीन रूपातील  शॉर्टहँड. अश्या ह्या लिपीत जेवढे साहित्य आहे, तेवढे जगातल्या  लुप्त झालेल्या कोणत्याही लिपीत लिहिलेले  सापडत नाही. अश्या लिपीचा अभ्यास करणे , त्यातील कागदपत्रे सांभाळणे , त्याचे लिप्यंतर करणे , अत्यंत आवश्यक आहे .

3 comments:

  1. knowledgeable ... keep it up

    Reply
  2. खूप छान

    Reply

4
SHARES

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना

Learn MoDi script online

ब्रेल लिपि